PostImage

P10NEWS

Aug. 25, 2024   

PostImage

NAXAL NEWS : कापेवंचा येथील निरपराध इसमाच्या खुनात पाहिजे असलेल्या …


 

   

    गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 89 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे.  
   

महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 02 लाख रुपयांचे बक्षीस.

 

       

       गडचिरोली/२१:- गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. येथे माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवाह्रांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या व मौजा कापेवंचा ता. अहेरी येथील निरपराध इसम नामे रामजी आत्राम याचे खुनामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास काल दिनांक 20/08/2024 रोजी अटक केली. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 89 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे.  
सविस्तर वृत्त असे आहे की, काल दि.20/08/2024 रोजी उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे दामरंचा हद्दीतील भंगारामपेठा  जंगल परिसरामध्ये उप-पोस्टे दामरंचा पोलीस पथक व सीआरपीएफ जी-9 बटा. चे जवान माओवाद विरोधी अभियान राबवित असतांना त्यांना सदर जंगल परिसरामध्ये एक संशयित व्यक्ती फिरत असतांना आढळुन आल्याने पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्यांनंतर त्याची अधिक सखोल चौकशी केली असता, त्याचे नाव प्रमोद मधुकर कोडापे, वय 37 वर्षे, रा. भंगारामपेठा, ता. अहेरी, जि. गडचिरोली असे असून, तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच मागील वर्षी दि. 24/11/2023 रोजी मौजा कापेवंचा येथील इसम नामे रामजी आत्राम रा. कापेवंचा ता. अहेरी जि. गडचिरोली याचा माओवादयांकडुन खुन करण्यात आला होता. त्यावरुन उप-पोस्टे राजाराम खां. येथे दाखल अप. क्र. 411/2023 कलम 302, 120(ब), 147, 148, 149, भादवि, सह कलम 3/27 भाहका मध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास प्रभारी अधिकारी उप-पोस्टे राजाराम खां. यांच्या ताब्यात देऊन सदर गुन्ह्रात अटक करण्यात आली. अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता.


अटक जनमिलिशिया आरोपीची माहिती
    
     नामे प्रमोद मधुकर कोडापे

-    दलममधील कार्यकाळ

.    सन 2017 पासून जनमिलिशीया सदस्य म्हणुन काम करीत होता.
.    सन 2017 पासुन गावात राहुन जनमिलिशीया म्हणून माओवाद्यांसाठी राशन आणून देणे, इतर साहित्य पुरविणे सेंट्री ड¬ुटी करणे, माओवाद्यांचे हत्यार लपवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती माओवाद्यास पुरविणे, पोलीस पार्टीबद्दल माओवाद्यांना माहिती देणे तसेच माओवाद्यांचे पत्रके जनतेपर्यत पोहचविणे व इतर काम तो करीत होता.

-    कार्यकाळात केलेले गुन्हे 

-    खुन – 01

-    मौजा कापेवंचा येथील रामजी आत्राम नावाच्या एका निरपराध इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

-    शासनाने जाहिर केलेले बक्षीस.

-    महाराष्ट्र शासनाने प्रमोद मधुकर कोडापे याच्या अटकेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, कमांण्डट जी-09 बटा. सिआरपीएफ श्री. शंभु कुमार,. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश. तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा श्री. शशिकांत दासुरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जी- 09 बटा. सिआरपीएफ श्री. अविनाश सोनी, प्रभारी अधिकारी उप-पोस्टे दामरंचा पोउपनि गणेश शिंदे, प्रभारी अधिकारी राजाराम खां. पोउपनि सचिन चौधरी व अंमलदार तसेच सिआरपीएफच्या जवानांनी पार पाडली.  तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

 


PostImage

P10NEWS

July 27, 2024   

PostImage

NAXAL SURRENDER : एका वरिष्ठ जहाल महिला माओवादीने केला गडचिरोली …



                                                              
                
नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला, एका वरिष्ठ जहाल महिला माओवादी कॅडरने केले गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण


  शासनाने जाहिर केले होते एकुण 08 लाख रूपयाचे बक्षिस.
  माओवाद्यांच्या गडचिरोली विभागाला संपूर्ण साहित्य पुरविण्याची जबाबदारी तिच्यावर होती.

शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 671 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 27 जूलै 2024 रोजी  जहाल महिला माओवादी नामे 1) रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता, कमांडर, टेलर टिम, गडचिरोली डिव्हीसी, वय 36 वर्ष, रा. बोटनफंुडी, ता. भामरागड, जि. गडचिरोली हिने गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित जहाल महिला माओवादी सदस्याबाबत माहिती
  
1)    रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता
     दलममधील कार्यकाळ

    सन 2007 पासुन सप्लाय टिम सदस्य म्हणुन काम करण्यास सुरुवात.
     सन 2007-2008 मध्ये शिवणकला, कापड कटींंग व शिलाई मशिन चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. 
     सन 2008-14 मध्ये टेलरींग टिममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती.
     सन 2014 मध्ये टेलर टिममध्ये कमांडर पदावर बढती होऊन आजपर्यत कार्यरत

    कार्यकाळात केलेले गुन्हे
     चकमक -01
    सन 2020 मध्ये मौजा पेरमिली भट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.

     खून -01
     सन 2019 मध्ये मौजा नैनवाडी जंगल परिसरात झालेल्या एका निरपराध इसमाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.

    आत्मसमर्पीत होण्याची कारणे.

    दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही.
    नक्षल दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.
    वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
    दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. 
    गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाला आहे.
    खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.
    चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.  
    नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.
    गडचिरोली जिल्ह्रात माओवाद्यांच्या तथाकथित क्रांतीने जनसमर्थन व आधार गमावला आहे.

    शासनाने जाहिर केलेले बक्षिस. 

   महाराष्ट्र शासनाने रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता हिचेवर 08 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.

  आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षिस.

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता हिला एकुण 5.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 23 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.  सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. शंभु कुमार, कमांण्डट 09 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.


PostImage

P10NEWS

July 27, 2024   

PostImage

भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे या …


भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे या निरपराध इसमाची पोलीस खबरी असल्याच्या खोटया कारणावरुन माओवादयांनी हत्या केली.
         गडचिरोली/(26): गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे व त्याची पत्नी रासो ऊर्फ देवे झुरु पुंगाटी हे दोघे सन 2007 पासुन भामरागड दलममध्ये सदस्य म्हणुन काम करीत होते. माओवादयांच्या तकलादु आणि खोटया क्रांतीची या दोघांना कल्पना आल्याने दोघांनी एकत्रीतपणे 07 जुलै 2017 रोजी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. आणि हिंसेचा मार्ग सोडुन स्वत:च्या प्रगतीचा मार्ग स्विकारला होता. हे दाम्पत्य माओवादयांचा हिंसेचा खोटा आणि विनाशकारी मार्ग सोडुन शांततेचा मार्ग स्विकारत शेती करून आयुष्य जगत होते. 
         काल दि. 25 जुलै 2024 रोजी ते दिनांक 26 जुलै 2024 चे मध्यरात्री  माओवादयांनी जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे याची आरेवाडा ते हिद्दुर रोडवरील PHC जवळ पोलीस खबरी असल्याच्या खोटया कारणावरुन हत्या केली. सदर हत्येप्रकरणी पोस्टे भामरागड येथे गुन्हा दाखल करण्यात येत असुन पुढील कायदेशीर कार्यवाही चालु आहे.तसेच भामरागड परिसरात माओवाद विरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे


PostImage

P10NEWS

July 24, 2024   

PostImage

NAXAL SURRENDER : भामरागड दलमच्या लच्चु करीया ताडो या जहाल …



                

 

   शासनाने जाहिर केले होते एकुण 02 लाख रूपयाचे बक्षिस.

         

गडचिरोली/भामरागड (24) : शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 670 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 24 जूलै 2024 रोजी  जहाल माओवादी नामे 1) लच्चु करीया ताडो, पार्टी सदस्य, भामरागड दलम, वय 45 वर्षे, रा. भटपार ता. भामरागड, जि. गडचिरोली याने गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती
    

1)    लच्चु करीया ताडो
    दलममधील कार्यकाळ

श्व्    सन 2012-13 पासुन गावात राहुन जनमिलिशीया म्हणून माओवाद्यांसाठी राशन आणून देणे, सेंट्री ड¬ुटी करणे, माओवाद्यांचे हत्यार लपवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती माओवाद्यास पुरविणे, पोलीस पार्टीबद्दल माओवाद्यांना माहिती देणे तसेच माओवाद्यांचे पत्रके जनतेपर्यत पोहचविणे व इतर काम तो करीत होता.

श्व्    सन 2023 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपर्यंत कार्यरत. 

      कार्यकाळात केलेले गुन्हे
  जाळपोळ -01
श्व्    सन 2022 मध्ये मौजा ईरपनार गावातील रोड बांधकामावरील 19 वाहनांची जाळपोळ करण्यामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

    इतर - 01
श्व्    सन 2023 मध्ये मौजा नेलगुंडा जंगल परिसरातील पायवाट रस्त्यातील जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

    आत्मसमर्पीत होण्याची कारणे.

    गडचिरोली पोलीस दलाच्या आक्रमक माओवादविरोधी अभियानामुळे माओवादी कारवायांचे कंबरडे मोडले आहे. 
    दलममधील सोबतच्या सदस्यांना पोलीसांकडून अटक करण्यात आल्याने व घरातील सर्व सदस्य व नातेवाईकांनी आत्मसमर्पण करण्यासाठी प्रवृत्त केल्यामुळे.
    दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे लागतात.  प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात.  जनतेच्या विकासासाठी तो पैसा कधीच वापरल्या जात नाही.
    दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. 
    वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
    वरीष्ठ माओवादी नेते पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच निष्पाप बांधवांना ठार मारायला सांगतात.
    गडचिरोली जिल्ह्रात माओवाद्यांच्या तथाकथित क्रांतीने जनसमर्थन व आधार गमावला आहे.

    शासनाने जाहिर केलेले बक्षिस. 

    महाराष्ट्र शासनाने लच्चु करीया ताडो याचेवर 02 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.

    आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षिस.

    आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन लच्चु करीया ताडो याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 22 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.  सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. दाओ इंजिरकान कींडो, कमांण्डट 37 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.